Birthday@Pithapuram
वाढदिवस@पिठापूरम
प्रथमच निघालो एकटाच
माझीया वाढदीसास
शरण होण्यास चरणी
श्री गुरू दत्तात्रयांच्या
होताच आगमन पिठापूरात
बुडले मन भक्ती भावात
दिसली समोरच गोमाता
रमला जीव वासरात
करूनी मी अभिषेक
अर्पिले श्रीफळ औदुंबरास
झाला सुरु मग होम
आकाशी पोहोचला भाव
कुतूहल वाढे सायंकाळी
सुरू झाली पालखीची तयारी
गरजत श्री गुरुदत्त नाम मुखी
खांद्यावर माझ्या श्रींची पालखी
वेळ आली आता निरोपाची
कसा जाऊ जड पावलांनी
घेतो भरून भक्तीचा घडा
बोलव मला पुढील वाढदिसा
- प्रेषक -
विवेक गजानन मठकर
१२ फेब्रुवारी २०२१ (12022021)
🙏श्रीपाद राजम शरणंम प्रपद्ये🙏दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा🙏


Good. Keep it up. Shree Gurudev Datta.
ReplyDeleteWah !! Tumhi Kavee pan aahat. Very nice Rachana. Repeats welcome. Regards. Abhay.
ReplyDeleteअतिशय सुंदर व भावपूर्ण लिखाण
ReplyDeleteश्री गुरुदेव दत्त।।
सुंदर रचना...👌👌
ReplyDeleteसुंदर भावपुर्ण कविता। 👌🙏
ReplyDeleteKupach chan
ReplyDeleteApratim
ReplyDelete