Wednesday, March 31, 2021

शिवाजी पार्क



शिवाजी पार्क

चैन पडेना चैन पडेना
शिवाजी पार्कला परिक्रमा विना
स्मरती लोचने आप्त सख्ख्या
प्रथम प्रदक्षिणा श्री ओंकारा

वसे वडा छायेत कालीमाता
भोवती रंगीबेरंगी कट्टा
शिवाजी महाराज राजे छत्रपती
पराक्रम ऐकता फुले छाती

वीर सावरकर सागर तीरी
ऊतुंग राष्ट्रप्रेम आम्ही ऋणी
हिंदू सम्राट बाळासाहेबांची ज्योती
तेवत राहील सदा हृदयी

मंदवारा झटे थांबण्यास
स्वच्छ निळे निळे आभाळ
पंख पसरे संधी प्रकाश
पार्क नेसे चांदण्यांची माळ

चैन पडेना चैन पडेना
शिवाजी पार्कला परिक्रमा विना
पडती पावले पटपट पटपट
घरी परतल्यावर उभा काट्यावर

5 comments:

  1. मस्त.. शिवाजी पार्क डोळ्यासमोर उभ राहिलं.. तुझ्यातला कवी असाच फुलूदे 👍👌👍👌

    ReplyDelete
  2. फारच सुंदर. 👌

    ReplyDelete
  3. फारच सुंदर. 👌

    ReplyDelete
  4. तुम्ही अजून इटलीलाच आहात का?

    ReplyDelete
  5. तुम्ही अजून इटलीलाच आहात का?

    ReplyDelete